राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित झाले आहेत. सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना मिळतील.