देशातील नागरिकांचे रक्षण करणार्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
पोलीस स्मृती दिन हा भारतातील सर्व पोलीस दलांमध्ये शहीद दिन म्हणूनही साजरा केला जातो.
सेवेदरम्यान बलिदान दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
1960 मध्ये 21 ऑक्टोबर हा राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महानिरीक्षकांची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती.
हा दिवस भारत-चीन संघर्षाला समर्पित आहे, जेव्हा 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय पोलिस दलावर गोळीबार केला होता.
अत्यंत परिश्रम आणि समर्पणाने आपले काम पार पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
हा दिवस देशाच्या पोलीस दलाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्तुती करण्यासाठी सर्वांसाठी एक स्मरणपत्र आहे.
पोलीस स्मृती दिन 2023: थीम2023 साठी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनाची थीम अद्याप घोषित केलेली नाही.