तुम्हालाही स्वतंत्र व्यवसाय (Business) करायचा असेल  तर आम्ही तुम्हाला दहा असे व्यवसाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमावू शकता. 

तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असल्यास तुम्ही दुधाचा व्यवसाय (Milk Production) सुरू करू शकता. एक किंवा दोन गायी, म्हशी घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

तुम्ही फुलांचा (Flowers) व्यवसाय देखील सुरू करू शकता.ऑनलाइन फुलं विक्रीही करता येते. सूर्यफूल, गुलाब, झेंडूची लागवड खूपच फायदेशीर ठरेल.

मधमाश्या (Honey Bee) पालनाचा व्यवसाय देखील चांगला फायदा देणारा आहे. केवळ एक ते दीड लाख रुपये खर्च करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, यासाठी थोड्या प्रशिक्षणाची गरज आहे.

भाजीपाला (Vegetable Farming) पिकवूनही तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. यासाठी खूप मोठ्या जागेची देखील आवश्यकता नाही.या शेतीत तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

कुक्कुटपालन (Poultry Farm) व्यवसायही अतिशय फायदेशीर असून यासाठी थोडी गुंतवणूक करावी लागते. अंडी आणि कोंबड्या विक्रीतून चांगला फायदा मिळतो.

कोरफडीची लागवड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. केवळ 10 हजार रुपये खर्च करून सुमारे 2500 रोपे लावू शकता. ही झाडे विकून किंवा कोरफड जेल (Alovera Gel) बनवूनही चांगले पैसे कमवू शकता.

पाणी पुरीचा सुध्दा तुम्ही व्यवसाय करु शकता, तुम्ही घरी पाणी पुरी साठी लागणाऱ्या पुऱ्या तयार करुन पाणीपुरी विकल्या दुकानदाराला विकुन भरपुर नफा करु शकता.