टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात.
टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं.
टोमॅटोच्या औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे.
खरंतर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो कॉलेस्टॉल असतं, जे वजन वाढू देत नाही.
टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत.
टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं.
मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.
टोमॅटो खाण्याचे जितके फायदे आहेत, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदेशीर आहे टोमॅटो सूप पिणं.