Sukanya Samriddhi Account: मुलीच्या भविष्यातील शिक्षणविषयक आणि लग्नविषयक गरजा भागविण्यासाठी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा हरियाणामधून केली होती.
काय आहे योजना?
✅ दहा वर्षाच्या आतील मुलींच्या नावे पोस्टामध्ये किंवा अधिकृत व्यापारी बॅंकेत मुलीच्या पालकांना सुकन्या समृध्दी खाते काढता येईल.
✅ कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकेल.
✅ दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे खाते काढण्याची सुविधा 2017 पासून देण्यात आली आहे.
✅ जुळया मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल म्हणजे त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेउ शकतील.
✅ या योजनेंतर्गत 10 वर्षाखालील मुलींचे खाते उघडले जाते.
✅ 250 रुपयांपासून ते दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
✅ वर्षभरात किमान रक्कम खात्यामध्ये भरली न गेल्यास 50 रु. इतका दंड आकारण्यात येतो.
✅ या योजनेअंतर्गत करण्यात येणारी गुंतवणुक प्राप्तिकर कायदा 1961 कलम 80 सी नुसार करमुक्त असेल तसेच या ठेवीवर मिळणारे व्याजही करमुक्त असेल.
✅ मुदत ठेवीचा कालावधी खाते उघडण्यापासून 21 वर्षे एवढा आहे.
✅ मॅच्युरिटीनंतर म्हणजेच मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर खाते बंद न केल्यास शिल्लक रकमेवर बॅंक किंवा पोस्ट खात्याच्या चालू व्याजदरात व्याज मिळत राहते.
✅ मुलीने 18 वर्षे पुर्ण केल्यास तिच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रकमेवर 50 टक्के रक्कम काढता येउ शकते.
1 thought on “सुकन्या समृध्दी खाते उघडा आणि मुलींचे आयुष्य उज्ज्वल करा! Sukanya Samriddhi Account”