NPS-UPS-RNPS NEWS : नुकत्याच काही महिन्यापुर्वी शासनाने पेन्शन संदर्भात शासन निर्णय काढून राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी पेंन्शनचा विकल्प देण्यासाठी दि. ३१/०३/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु कर्मचा-यांकडून मुदत वाढीसाठी मागणी केली जात होती. त्या संदर्भात शासनाने आदेश काढून विकल्प देण्याची मुदत दि. ३१/०३/२०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.३१.०३.२०२५ पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी १ वर्ष म्हणजेच दि.३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.