दिवाळी सणानिमित्त मिळणार 100 रुपयांमध्ये (आनंदाचा शिधा) १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा शासन निर्णय जाहीर

Diwali festival Aandacha Shidha Yojna :  दिवाळी सणानिमित्त १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधाशिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. सदर शिधाजिन्नस संच प्रति संच ₹१००/- रुपयाला मिळणार आहे. सदरचे वितरण हे दि. २५ ऑक्टोबर, २०२३ पासून दि. ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत रास्त धान्य दुकानदार मार्फत होणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी सन २०२३ मधील दिवाळी सणानिमित्त १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधादि. २५ ऑक्टोबर, २०२३ पासून दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ईपॉस प्रणालीद्वारे ₹ १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सुकन्या समृध्दी खाते उघडा आणि मुलींचे आयुष्य उज्ज्वल करा! Sukanya Samriddhi Account

त्यानुषंगाने पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ईपॉस प्रणालीद्वारे प्रति संच ₹ १००/- या दराने वितरीत करावेत..

. जस्ट किचन प्रा.लि व इंडो अलाईड प्रोटीन फुड प्रा. लि., या पुरवठादारांकडून पुरवठा करावयाच्या शिधाजिन्नस संचांच्या जिल्हानिहाय संख्येचे अनुक्रमे परिशिष्ट १ व २ सोबत जोडलेले आहे. सदर संख्येच्या मर्यादेत जस्ट किचन प्रा.लि. व इंडो अलाईड प्रोटीन फुड्स प्रा. लि. यांनी शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामांपर्यंत विहित मुदतीत पोहोचवावेत.

. गोदामात येणारी शिधाजिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे शिधाजिन्नस यांची नोंद online पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार AePDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी.

. जिल्ह्याकरीता आवश्यक असणारे पुरवठादाराकडून प्राप्त होणारे शिधाजिन्नस तालुका गोदामांमध्ये व्यवस्थितरीत्या उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांची राहील. शिधाजिन्नस उतरविण्याकरीता येणाऱ्या हमाली खर्चाचे प्रदान विभागाकडून करण्यात येईल. त्यानुषंगाने सदर देयके वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सादर करण्यात यावीत.

. शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस खराब होण्याची/ खाण्यास अयोग्य होण्याची मुदत (expiry date) साखर, चना डाळ, पोहा, खाद्यतेल याकरीता कमीतकमी ४ महिन्यांची व मैदा, रवा याकरीता कमीतकमी ३ महिन्यांची असल्याची खात्री करूनच पुरवठादाराकडून शिधाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत.

. शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याचे NABL अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून प्राप्त करुन घेऊन तद्नंतरच शिधाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिघाजिन्नस / शिधाजिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

19. पुरवठादाराकडून तालुका गोदामात शिधाजिन्नस संच प्राप्त झाल्यावर, जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांनी स्वतः अथवा तहसिलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून शिधाजिन्नस संचाची पुरवठादाराच्या प्रतिनिधीसमोर यादृच्छिकपणे (randomly) नमुने गोळा करावेत. सदर नमुन्यांची NABL अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी. सदर तपासणीअंती नमुना विहित निकषांची पुर्तता करीत नसल्याचे आढळल्यास, पुरवठादारास तात्काळ अवगत करून संबंधित शिधाजिन्नस संचाचा साठा (Lot) बदलून घेण्याबाबत कार्यवाही करावी.

. सदर शिधाजिन्नस संच प्रति संच ₹१००/- या दराने वितरीत करावयाचे आहेत. सदर विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम रास्तभाव दुकानदारांनी मार्जिन वजा करुन उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांच्याकडे शिधाजिन्नस संचांच्या वितरणानंतर ७ दिवसांत जमा करावी. तसेच शिधाजिन्नस संच वितरणाचा कालावधी विचारात घेता, दि.२५.१०.२०२३ ते दि.३०.११.२०२३ या कालावधीत संपूर्ण शिधाजिन्नस संचांचे वितरण करण्याबाबत रास्तभाव दुकानदारांना सूचित करण्यात यावे.

शासन निर्णय डाऊनलोड करा

GR आनंदाचा शिधा वितरण

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच