🔰 आजच्या लेखामध्ये आपण राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतून अंशतः रक्कम कशी काढावी याबद्दल जाणून घेणार आहोत. NPS मधून रक्कम WITHDRAWAL करण्यासाठी काही महत्वाचे Rules लागु केलेले आहेत. ते कोणकोणते NPS Withdrawal Rules आहेत. आपण सविस्तर या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला एनपीएस मधून रक्कम Withdrawal ला कोणतीही अडचण येणार नाही. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्मचा-यांना त्यांच्या स्वतःच्या अंशदानाच्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार खालील कारणांकरीता काढता येईल.
NPS मधून कोणत्या कारणांसाठी रक्कम काढता येणार?
NPS Withdrawal Rules :
🔰 यामध्ये स्वतःच्या किंवा दत्तक मुलगा/मुलगी यांच्या उच्च शिक्षणाकरिता तसेच त्यांच्या विवाहाकरिता रक्कम काढता येईल.
🔰 कर्मचा-यांच्या स्वतःच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या नावे घर खरेदीकरीता सुध्दा रक्कम काढता येईल. तथापि कर्मचा-यांच्या स्वतःच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या नावे एखादे घर असेल तर अशा कर्मचा-यास या प्रयोजनासाठी रक्कम काढता येणार नाही.
🔰 निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांची या आधिच्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सभासद, सभासदाचा कायदेशीर वैवाहिक जोडीदार/मुले/दत्तक मुले/अवलंबून असलेले आई-वडील यांच्या खालील गंभीर आजारासाठी (वैद्यकीय प्रमाणपत्राच्या अधारे) अशंतः रकमेचे आहरण अनुज्ञेय आहे.
1) कर्करोग ( Cancer)
2) मूत्रपिंड निकामी होणे ( Kidney Failure- End Stage Renal Failure)
3) प्राथमिक पलमनरी धमनी उच्च रक्तदाब ( Primary Pulmonary Arterial Hypertension)
4) एकाधीक स्क्लेरोसिस ( Multiple Scierosis)
5) प्रमुख अवयव प्रत्यारोपण (Major Organ Transplant)
6) कोरोनरी आर्टरी बायपास कलम ( Coronary Artery bypass Graft)
7) महाधमनी कलम बायपास शस्त्रक्रिया ( Aorta Graft Surgery)
8) हृदय झडप शस्त्रक्रिया ( Heart Valve Surgery)
9) स्ट्रोक ( Stroke)
10) हदय स्नायुमध्ये रक्ताची गुठळी होणे ( Myocardial Infarction)
11) कोमो ( Coma)
12) संपूर्ण अंधत्व ( Total Blindness)
13) कोविड-19 ( Covid-19)
14) अर्धांगवायू ( Paralysis)
15) गंभीर जीवघेणी दुर्घटना ( Accident of Serious/ Life threatening nature)
16) या व्यतिरिक्त PFRDA यांच्याकडून यापुढे निर्गमित होणा-या परिपत्रकानुसार अन्य गंभीर आजारासाठी रक्कम काढता येईल.
किती वर्षांनी NPS मधून रक्कम काढता येणार?
🔰 राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत (National Pension System) कर्मचा-यांस त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर केवळ कर्मचा-यांच्या जमा अंशदानाच्या संचित राशीतून रक्कम आहरण करता येईल.
सेवा कालावधीत किती वेळा रक्कम काढता येणार?
🔰 कर्मचा-यास त्यांच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा अंशतः रक्कम काढता येईल.
NPS मधून रक्कम काढण्याचा अर्ज कोणाकडे सादर करावा?
🔰 शासकीय कर्मचा-यांनी अंशतः रक्कम काढण्यासाठी लेखी अथवा ऑनलाईन अर्ज त्यांच्या आहरण व संवितरण अधिका-यांना सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करुन जोडावी.
🔰 आहरण व संवितरण अधिकारी यांनी अंशतः रक्कम काढण्याचा कर्मचा-याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसात त्याची छाननी करतील. मागणी नियमानुसार असल्यास असा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अधिदान व लेखा कार्यालय तथा कोषागार कार्यालय यांचेकडे सादर केला जाईल.
🔰 अधिदान व लेखा कार्यालय तथा कोषागार कार्यालय सदर अर्जाची तीन दिवसात छाननी पूर्ण करेल व मागणी अर्ज नियमानुसार असल्यास निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांच्याकडे सादर केला जातो. अन्यथा प्रकरण आक्षेपित करुन परत पाठविले जाते.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे दि. 08 ऑक्टोंबर 2021 चे परिपत्रक वाचु शकता. किंवा आपल्या कार्यालयात चौकशी करु शकता.