Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे देण्याची सरकारची योजना आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे. या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या योजनेद्वारे दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातील.
ज्या शेतकऱ्यांना आधीच पीएम सन्मान योजनेद्वारे पैसे मिळत आहेत त्यांनाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून शेतकऱ्यांना या योजनेचा एकही लाभ मिळालेला नाही.’नमो शेतकरी महा सन्मान’ या योजनेच्या निधीचा पहिला भाग म्हणून शेतकऱ्यांना 1720 कोटी रुपये अदा करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमीत झालेला आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये महाराष्ट्र सरकार आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.तसा शासन निर्णय सुध्दा निघालेला आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजनेचा पहिला हप्ता काल शेतकऱ्यांच्या खाती जमा झाल्याचा संदेश प्राप्त झालेले आहेत. तुम्ही पण तुमचा हप्ता आला की नाही ते बँकेत जावून पाहू शकता.
शासन निर्णय पहा