“नमो शेततळे अभियान” अंतर्गत मागेल त्‍याला शेततळे योजना

नमो शेततळे अभियान 2023 : राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड (Dry Spells) या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळयासारखी पायाभूत सुविधा उभी करुन पाण्याची साठवणूक करणे, शेतकयांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेत तळयासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत नमो शेततळे अभियानराबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नमो शेततळे अभियान
NAMO SHET TALE ABHIYAN

शासन परिपत्रक :

. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतगर्त राज्यात “नमो शेततळे अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यात ७३०० शेततळे उभारण्यात येतील..

. छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांमध्ये करण्यात येईल.

. छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतुन नमो शेततळे अभियान राबविण्यात यावे.

. सदर अभियानाच्या अंमलबजावणी करिता छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.

. सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त (कृषि) यांनी उचित कार्यवाही करावी.

अशा सुचना शासना निर्णयामध्ये दिलेल्या आहेत.

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच