मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम: तरुणांसाठी महिन्याला 10,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी

Mukhyamantri Yojanadoot scheme: राज्य सरकारच्या विविध योजनांवर सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे *मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojanadoot)* उपक्रम आहे. या उपक्रमात तरुणांना दर महिन्याला 10,000 रुपये कमावण्याची उत्तम संधी मिळणार आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी केवळ 6 दिवस शिल्लक आहेत.

10,000 रुपये मानधनाची संधी

राज्य सरकारने सामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी *मुख्यमंत्री योजनादूत* उपक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत, निवड झालेल्या तरुणांना राज्यातील विविध योजना सामान्यांना समजावून सांगाव्या लागणार आहेत. यासाठी निवड झालेल्या योजनादूतांना प्रतिमहिना 10,000 रुपये मानधन दिले जाईल. हा मानधन 6 महिन्यांसाठी दिला जाणार आहे. राज्यभरातून 50,000 योजनादूतांची निवड केली जाणार असून, या उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

तरुणांना या उपक्रमात सहभागी होऊन दर महिन्याला 10,000 रुपये कमवण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे आणि पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. अर्ज करणारा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडलेले असावे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना उमेदवाराला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

– आधारकार्ड

– पासपोर्ट साईज फोटो

– पदवीचे प्रमाणपत्र

– रहिवासी प्रमाणपत्र (सही व शिक्क्यासह)

– वैयक्तिक बँक खात्याचा तपशील

उमेदवार https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करावा याची महिती साठी आमचे चॅनेल फॉलो करा

.https://whatsapp.com/channel/0029VajUXm0A2pLKtA6UJt3j

तरुणांसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असून, राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक लाभ मिळवता येईल. त्यासाठी

लवकरात लवकर अर्ज करा.

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच