जयावंतराव सावंत काॅमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये पुस्तके व संशोधन पत्रिका प्रकाशन सोहळा संपन्न

जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयावरील 28 पुस्तके व 15 संशोधन पत्रिकेचे ०६/०२/२०२४ रोजी प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रम इंटरनॅशनल जनरल ऑफ मायक्रोबियल सायन्स व माय रेज पब्लिकेशन सेंटर, हडपसर, पुणे, एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, धायरी, अमृतेश्वर आर्ट्स, सायन्स, अँड कॉमर्स कॉलेज, विंझर, यशवंतराव चव्हाण आर्ट्स अँड सायन्स कॉलेज,मंगरुळपीर, गुलाम नाभी आजाद कॉलेज, बार्शीटाकळी, जयंतराव सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, हडपसर, पुणे, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय,पारोळा, बायोराइझ अॅनालिटिकल रिसर्च लॅबोरेटरी, बेडग, केशरबाई सेनाजीराव श्रीसागर उर्फ काकू आर्ट्स,‌ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, बीड, कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, नाशिक, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, पारुल युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, पारुल युनिव्हर्सिटी, गुजरात, डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर एज्युकेशन अँड ॲडव्हान्स रिसर्च, संभाजीनगर, शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अकोला, विद्याभारती महाविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. 

यावेळी सुक्ष्मजीवशास्त्र (१९), रसायनशास्त्र (०१) वनस्पतीशास्त्र (०७) पर्यावरणशास्त्र (०१) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या १५ संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

‌ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयवंतराव सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च चे संचालक डॉ. मनोहर कराडे हे होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष पद जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत माने-देशमुख यांनी भूषविले.

तसेच विचारमंचावरती सुषमा शितोळे (शास्त्रीय व्यवस्थापक, इंटरनॅशनल जनरल ऑफ मायक्रोबियल सायन्स), निशा बरड (शास्त्रीय बुक डीव्हीजन व्यवस्थापक, संशोधन पत्रिका विभाग), डॉ. अमोल पाटील (शास्त्रीय व्यवस्थापक, माय रेज पब्लिकेशन सेंटर, वनस्पतीशास्त्र विभाग), डॉ.संजय गायकवाड (प्रभारी प्राचार्य, बी.जे.स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वाघोली), डॉ महेश चवदार ( डायरेक्टर बायोराइझ अनॅलिटिकल अँड रिसर्च सेंटर, बेडग), तृप्ती धकाते (प्रोपराईटर, क्वालिटी मशरूम फार्म, कुंबरो, भोर), अर्चना घाडगे, (सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, जयावंतराव सावंत काॅमर्स अँड सायन्स कॉलेज, हडपसर, पुणे) व राजेश ढाकणे (संस्थापक इंटरनॅशनल जनरल ऑफ मायक्रोबियल सायन्स, माय रेज पब्लिकेशन सेंटर हडपसर, पुणे) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुदिप्ता बॅनर्जी, प्रज्ञा जोशी, साक्षी गोरे यांनी केले व आभार डॉल्फिना वसर यांनी मानले. प्रा. सुनील हडके यांनी व्यवस्थापन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महावि्यालयाच्या विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.

तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. संजय सावंत (संकुल संचालक, जे.एस.पी.म, हडपसर) डॉ. वसंत बुगडे (संकुल संचालक, जे.एस.पी.म, हडपसर)‌ यांनी मार्गदर्शन केले.

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच