जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पुस्तके व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवरील पुस्तके व बक्षीस वितरण समारंभ ३१/०७/२०२४ रोजी पार पडला. सदर कार्यक्रम इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबिअल सायन्स, माय रेज पब्लिकेशन सेंटर हडपसर, पुणे, एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नऱ्हे, धायरी रोड, अमृतेश्वर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,विंझर ता. वेल्हे, यशवंतराव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, मंगरूळपीर गुलाम नाबी आझाद कॉलेज, बार्शी टाकळी, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, हडपसर, पुणे, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय परोला, बायोराईज ऍनालायटीकेल अँड रीसर्च लॅबोरेटरी बेडग, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बीड, कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नाशिक, रीसर्च अँड डेव्हलपमेंट सेल पारुल इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईडसायन्सेंस, पारुल युनिव्हर्सिटी गुजरात, डॉ. रफिक झकारिया सेंटर फॉर हायर एज्युकेशन, संभाजीनगर, शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अकोला, विद्या भारती कॉलेज सेलू, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अँड रीसर्च, हडपसर, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. याप्रसंगी नवीन शैक्षणिक प्रणाली आधारित सूक्ष्म जीवशास्त्र विषयाची ११ पुस्तके समावेशित
करण्यात आली. 28 लेखक व संशोधकांना ‘उत्कृष्ट संशोधक / लेखक’ म्हणून गौरविण्यात आले. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद विद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या बोर्ड ऑफ स्टडीज चे प्रमुख डॉ. सुनील पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व अध्यक्षस्थान जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुदिप्ता बॅनर्जी, प्रज्ञा जोशी यांनी केले व आभार रजनीगंधा साळुंके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. संजय सावंत (कॅम्पस डायरेक्टर, जेसपीम, हडपसर), वसंत बुगडे (कॅम्पस डायरेक्टर, जेसपीम, हडपसर) यांनी मार्गदर्शन केले.

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच