ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग कसे करावे? IRCTC ticket booking online

भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया खूप सोपी केली आहे. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल फोनद्वारेही आता रेल्वे टिकीट बुक करु शकतो. टिकीट बुक करण्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर माहिती खालील दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही टिकीट बुक करु शकतात.

1. IRCTC वेबसाइटला भेट द्या

IRCTC म्हणजे Indian Railway Catering and Tourism Corporation ही भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट आहे जिथे तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. IRCTC वेबसाइट उघडण्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये URL टाका.

2. नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा

तुमच्याकडे आधीच खाते असल्यास, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर तुमच्याकडे खाते नसेल तर “Register” पर्यायावर क्लिक करून नवीन खाते तयार करा.

3. तुमचा प्रवास नियोजन करा

लॉगिन केल्यानंतर, “Plan My Journey” पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा प्रस्थान स्टेशन, गंतव्य स्टेशन, प्रवासाची तारीख आणि वर्ग (स्लीपर, एसी, इ.) निवडा.

4. गाड्यांची यादी पाहा

तुमच्या निवडलेल्या मार्गावर उपलब्ध असलेल्या गाड्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला हवी असलेली गाडी निवडा.

5. सीटची उपलब्धता तपासा

तुम्हाला निवडलेल्या गाडीत सीट उपलब्ध आहे का ते तपासा. जर सीट उपलब्ध असेल, तर “Book Now” पर्यायावर क्लिक करा.

6. प्रवाशांची माहिती भरा

तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांचे नाव, वय, लिंग, आणि ओळखपत्र क्रमांक यासारखी माहिती भरावी लागेल. प्रत्येक प्रवाशासाठी वेगळी माहिती द्यावी लागेल.

7. पेमेंट प्रक्रिया

माहिती भरल्यानंतर, पेमेंटसाठी विविध पर्याय निवडा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, किंवा ई-वॉलेट्स यांपैकी कुठलाही पर्याय निवडू शकता. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक ई-तिकीट प्राप्त होईल.

8. ई-तिकीटची छपाई करा किंवा मोबाईलवर साठवा

पेमेंट झाल्यानंतर, तुम्हाला तिकीटाची PDF फाइल मिळेल. तुम्ही ती फाइल प्रिंट करून घरी ठेवू शकता किंवा मोबाईलवर साठवू शकता. हे ई-तिकीट प्रवासाच्या वेळी आपल्या सोबत ठेवा.

9. SMS द्वारे माहिती प्राप्त करा

तिकीट बुक केल्यानंतर, तुम्हाला SMS द्वारे प्रवासाची माहिती पाठवली जाईल. त्यामध्ये PNR क्रमांक आणि तिकीटाची इतर माहिती असेल.

PNR क्रमांकांद्वारे तुम्ही टिकीट कन्फर्म झाले की नाही तसेच वेटिंग किती आहे ते पण पाहू शकता.

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच