HSC RESULT 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी.
BARAVI NIKAL 2025
निकाल पाहण्यासाठीची पद्धत:
१. राज्य मंडळाची अधिकृत संकेतस्थळे उघडा:
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
२. ‘HSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name – इंग्रजीत पहिली तीन अक्षरे) टाका.
४. माहिती भरल्यानंतर ‘Submit’ किंवा ‘View Result’ वर क्लिक करा.
५. निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा PDF स्वरूपात सेव्ह करा.
महत्त्वाच्या सूचना: निकाल ऑनलाइन स्वरूपात प्राथमिक आहे. मूळ गुणपत्रक पुढील काही दिवसांत संबंधित शाळांमध्ये दिले जाईल.
अधिकृत वेबसाइट्स व्यतिरिक्त कोणत्याही लिंकवर विश्वास ठेऊ नका.
निकाल पाहताना वेबसाइट स्लो होऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा