how to file court case online  | ऑनलाईन कोर्ट केस कशी दाखल करावी?

how to file court case online : महाराष्ट्रातील कोणत्याही न्यायालयात प्रकरण दाखल करायचे असल्यास आता ऑनलाईन दाखल करण्याची सुविध उपलब्ध झालेली आहे. देशातील कोणत्याही राज्यातील न्यायालयामध्ये ऑनलाईन केस दाखल करण्यासाठी https://filing.ecourts.gov.in/pdedev/ या पोर्टलचा वापर करावा. हे संकेतस्थळावर सर्वप्रथम नोंदणी करुन ऑनलाईन केस दाखल करता येईल. सदर संकेतस्थळावर ऑनलाईन केस दाखल करण्यासाठी खालील स्टेपचा वापर करावा.

how to file court case online  | ऑनलाईन कोर्ट केस कशी दाखल करावी?

Step १

सर्वप्रथम कोणत्याही ब्राउजरमध्ये https://filing.ecourts.gov.in/pdedev/ हा पत्ता टाईप करावा, त्यानंतर तुम्हाला होम पेज ओपन झालेले दिसेल. New User ? Register here या टॅबवरती क्लिक करुन विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरुन तुमचे युझर आयडी व पासवर्ड तयार करा.

Step

तयार झालेल्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन खाते ओपन करा.

Step ३

तुमच्या ठिकाणानुसार, केसच्या प्रकारानुसार व न्यायालयाच्या अधिकारक्षेञानुसार न्यायालयाची निवड करा.

Step 4

तुम्हाला फाइल करायचा असलेल्या केसचा प्रकार निवडा. न्यायालयांमध्ये अनेकदा विविध केस प्रकारांसाठी वेगवेगळे ऑनलाइन फॉर्म असतात.

Step 5

वरील संकेतस्थळावर विचारलेली माहिती काळजीपूवर्क भरा तसेच कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार केस दाखल करताय ते कलम निवडा. तसेच विचारलेल्या वादी/प्रतिवादी ची माहिती भरा. व सबमिट करा.

Step 6

तुमच्या केसशी संबंधित सहाय्यक दस्तऐवज अपलोड करावे लागतील, जसे की करार, पुरावे किंवा इतर संबंधित साहित्य.हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन पीडीएफ करुन अपलोड करा.

Step 7

तुमच्या केसच्या प्रकारानुसार व नियमानुसार लागणारे कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम ऑनलाईन ग्रास महाकोष या पोर्टलवरतील अदा करुन त्याची प्रिंट ऑनलाईन अपलोड करा.

Step 8

अपलोड केलेल्या कागदपत्रांची अनुक्रमणिका तयार करा. म्हणजेच इंडेक्स तयार करा.

Step 9

अपलोड केलेल्या कागदपञांवर ऑनलाईन सही करा. सही करण्यासाठी तुम्ही दिलेल्या विविध पर्यायांचा वापर करु शकता. किंवा ओटीपी द्वारे सुध्दा हि स्टेप पुर्ण करता येईल.

Step 10

ऑनलाईन कॅमेरासमोर शपथ घ्या. व ती ऑनलाईन अपलोड करा.

Step 11

आता तुमची केस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सबमिट करा.त्यानंतर तुम्हाला ईफायलिंग क्रमांक मिळेल.

वरील सर्व स्टेप पुर्ण केल्यानंतर तुम्ही दाखल केलेले सर्व योग्य असेल तर मेहरबान कोर्टाकडून तुमची केस स्वीकारली जाईल व त्यांला एक क्रमांक मिळेल तसा संदेश तुम्हाला मिळेल.

सदर माहिती आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरु नका. धन्यवाद

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच