तुमची पगार स्लिप अशी करा डाउनलोड
how to download sevarth salary slip in mahakosh sevarth portal : कार्यालयातून ब-याचवेळी तुम्हाला लवकर तुमची पगार स्लिप मिळत नाही. प्रत्येक महिन्याचा पगार झाला की तुम्हाला तुमची पगार स्लिप मिळाली पाहिजे. परंतु काही कारणास्तव ती लवकर मिळत नाही यावर उपाय म्हणजे आता तुम्ही स्वतः कोणत्याही महिन्याची पगार स्लिप ऑनलाईन काढू शकता. प्रथम तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक कोणत्याही महिन्याची पगार स्लिप पाहिजे त्यामध्ये तुमचा सेवार्थ आयडी दिलेला असतो तो असेल तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड ifms123 हा असतो.
तर चला मग स्लिप डाउनलोड करण्यास सुरु करुयात
प्रथम गुगल मध्ये https://sevaarth.mahakosh.gov.in हि वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये तुमचा लॉगिन युझर आयडी आणि पासवर्ड टाका त्यानंतर कॅपच्या इंटर करा. आणि सबमिट बटण व क्लिक करा.
सबमिट बटण वर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल त्यानंतर employee corner ला क्लिक करा व VIEW SLIP ला वर क्लिक करा व ज्या महिन्याची स्लिप पाहिजे तो महिना व वर्षे निवडून सबमिट केले की तुम्हाला पगार स्लिप डाउनलोड करता येईल.