(Manba Finance IPO allotment ) : मनबा फायनान्स लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये (IPO) गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. आता बोलीचा कालावधी संपल्याने, सर्वांच्या नजरा IPO च्या वाटपावर आहेत. तुम्हाला आयपीओ लागला की नाही हे कसे तपासायचे ते आता पाहु.
Manba Finance IPO वाटप स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी त्यांच्या रजिस्ट्रार च्या पोर्टलवर जावून आयपीओ लागला की नाही ते पाहु शकता. त्यासाठी प्रथम तुम्ही खालील स्टेप चा वापर करुन ते पाहु शकता.
१. या लिंकचा वापर करून IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटला भेट द्या: https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html.
२. ‘कंपनी निवडा’ ड्रॉपडाउन मेनूमध्ये, ‘मनबा फायनान्स लिमिटेड’ निवडा.
३. तुमचा पसंतीचा पर्याय निवडा – पॅन, अर्ज क्रमांक, डीपी आयडी किंवा खाते क्रमांक.
४. निवडलेल्या पर्यायावर आधारित संबंधित तपशील प्रविष्ट करा.
५. ‘शोध’ वर क्लिक करा.
६. तुमची मानबा फायनान्स IPO वाटप स्थिती नंतर स्क्रीनवर प्रदर्शित होईल.