Home loan process step by step in Marathi : प्रत्येक कुटुंबाला एका घराची गरज असते. आपण कुठेही राहत असलो तरी प्रत्येकाचे एक स्वप्न असते की स्वतःचे हक्काचे एक घर असावे. प्रत्येकाची घर घेण्याची इच्छा असते परंतु पैशाच्या अडचणीमुळे ते लवकर शक्य होत नाही. तसेच आपली बचत कमी असते. यातून मार्ग म्हणजे गृह कर्जाचा (Home loan) पर्याय असतो. या लेखामध्ये आपण आपण गृह कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तसेच त्याची प्रोसेस कशी असते याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
घर घेण्याचे ठरविले असल्यास प्रथमतः तुमचे अभिनंदन. घर पसंत पडल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अशा बॅंकचा शोध घ्यावा की गृहकर्जाचा व्याजदर(Home Loan Interest Rates) हा इतर कर्जाच्या तुलनेत खूप कमी असतो. म्हणजेच बिझनेस लोन(business loan), वैयक्तिक कर्ज (Personal loan), कार लोन( Car loan), शैक्षणिक कर्ज(education loan) यांच्या तुलनेत गृहकर्ज स्वस्त असते.
इतर बॅंकांच्या तुलनेत ज्या बॅंकचे गृहकर्जाचे व्याजदर तसेच प्रोसेसिंग फी व इतर शुल्क कमीत कमी असतात. अशा बॅंकेची गृह कर्जासाठी निवड केल्यास फायदेशीर ठरते. गृहकर्जाच्या व्याजदराबाबत तुम्हाला बॅंकेमध्ये किंवा इंटरनेवर सविस्तर माहिती मिळू शकेल.
गृहकर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? (What are the documents required for home loan?)
1) पॅनकार्ड
2) आधार कार्ड
3) पासपोर्ट आकाराचे फोटो
4) वय प्रमाणपत्र
5) इतर आवश्यक कागदपत्रे
गृहकर्जासाठी (Home loan)साठी कोणती कागदपत्रे लागतात?
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तीन वर्षाचा आयटीआर फाईल विवरण पत्र लागेल व तुम्ही जर नोकरी करत असाल तर कार्यालयाकडून दिला जाणारा फॉर्म क्र.16 सादर करावा लागेल. तसेच यासोबत तुम्हाला नजीकच्या तीन महिन्याच्या पगार स्लिप सुध्दा जोडाव्या लागतात. तसेच तुम्ही गृह कर्जाव्यतिरिक्त घेतलेल्या कर्जाचे बॅंक स्टेटमेंट सुध्दा मागु शकतात.
प्रॉपर्टी ची कोणती कागदपत्रे लागतील? What are the property documents required?
यामध्ये प्लॅट(Flat) घेताय ती जागा एनए (N.A) झाल्याची ऑर्डर तसेच तो N.A कोणी मंजुर केला म्हणजे तो प्लॉट तहसीलदार N.A आहे की कलेक्टर N.Aआहे. N.A.असल्यास लोन होताना कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसेच सिव्हील इंजिनिअरकडून बिल्डींग प्लॅन घेतला जातो, त्यालाच आपण ब्लु प्रिंट असे म्हणतो. ती ब्लु प्रिंट बॅंकेला सादर करावी लागते.
तसेच त्या प्रॉपर्टीची आता सध्याचा बाजारभाव काय आहे? त्यासाठी बॅंक सिव्हील इंजिनिअर कडून रिपोर्ट तयार करुन घेते. तसेच त्या प्रॉपर्टीचे टायटल पाहिले जाते. म्हणजे त्या प्रॉपर्टीवर काही लिगल इश्यु आहे का ते पण पाहिले जाते. तसेच बांधकाम चालु करण्यासाठी घेतलेली परवानगी तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कंम्प्लीशन सर्टीफिकेट (building completion certificate) सुध्दा बॅंक पाहत असते.
तुम्हाला लोन किती मिळेल हे तुम्ही कोणता व्यवसाय किंवा नोकरी करता यावर ठरते. तसेच तुमचे वय किती यावर सुध्दा लोन Amount ठरविली जाते. ज्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचे ठरविले आहे त्या ठिकाणी त्याची मार्केट व्हॅल्यु किती आहे. हे सुध्दा चेक केल जात. तसेच तुमचा सिबील स्कोर (Cibil ) 750 च्या वर असल्यास लोन लवकर मंजुर होते. बॅंकेकडून तुम्ही जेथे व्यवसाय करता तेथे सुध्दा भेट देण्याची शक्यता असते.
कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर बॅंकचा क्रेडिट मॅनेजर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट ( rate of interest) फिक्स केला जातो. तसेच तुमचा इएमआय (E.M.I) कॅल्युलेट करुन लोन amount मंजुर करतो. ज्या दिवशी खरेदी दस्त ( sale deed)सब रजिस्ट्रार कार्यालयात (Sub registrar) होतो त्या दिवशीच बॅंकेकडून डी.डी. सेलरला दिला जातो व खरेदी दस्त बॅंक स्वतःकडे सादर करुन घेते. म्हणून खरेदी दस्त झाल्यानंतर त्याच्या दोन-तीन झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवाव्यात.
सूचना- अधिक माहितीसाठी संबंधीत क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेउन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधीत कोणतही व्यक्ती जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
1 thought on “घर/प्लॅट घेण्यासाठी होम लोन कसे करावे?वाचा अटी व शर्ती! Home loan process step by step in Marathi”