DA Hike 4 percent : महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने आज (बुधवार, 18 ऑक्टोबर) केंद्रीय सरकारी कर्मचार्यांसाठी 4 टक्के DA वाढीची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के केला आहे. सदरचा वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. महागाई भत्त्याचा दर 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत 24 मार्च 2023 रोजी वाढविण्याची घोषणा केली होती.
भारतातील टॉपची पर्यटन स्थळे माहिती आहेत का ?
महागाई भत्ता वाढ कधीपासून मिळणार?
आतापर्यंत, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता (DA)दिला जात होता. केंद्र सरकारने आज 4 टक्के डीए वाढवल्याची घोषणा केल्यामुळे हा दर 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी घोषित केलेल्या डीए वाढ ही जुलै 2023 पासूनची थकबाकी देखील ऑक्टोबरच्या पगारासह वितरित केली जाणार आहे.
महागाई भत्ता म्हणजे काय?
वाढत्या किमतीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दर सहा महिन्याला घोषीत केला जातो. म्हणजेच महागाई भत्ता किंवा महागाई सवलत वर्षातून दोनदा वेळोवेळी सुधारित केली जाते.