CDSL SHARE PRICE UPDATE : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CENTRAL DEPOSITORY SERVICES (INDIA) LIMITED) ही एक भारतीय केंद्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी आहे. सीडीएसएल कंपनीची एनएसई मध्ये दि 30 जून 2017 रोजी लिस्ट झाली होती. चालु डिमॅट खात्यांच्या संख्येनुसार सीडीएसएल ही भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. फेब्रुवारीमध्ये, 60 दशलक्ष सक्रिय डीमॅट खाती उघडणारी भारतातील पहिली डिपॉझिटरी बनली आहे. हि कंपनी डिपॉझिटरी सेवा, डेटा प्रोसेसिंग सेवा आणि इतर सेवा प्रदान करते.
सध्या या कंपनीचे शेअरची किंमत खूपच वेगाने वाढत आहे. या कंपनीचे गेल्या पाच दिवसांमध्ये गूंतवणुकदारांना जवळपास 20.21 टक्के नफा झालेला आहे. या कंपनीच्या शेअर्रची किंमत दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी जवळपास 1160 रुपये होती. आता या कंपनीच्या शेअर्रची किंमती म्हणजे दि. 11 सप्टेंबर रोजी जवळपास 1393.80 इतकी वाढली आहे. म्हणजेच गेल्या पाच दिवसांमध्ये गूंतवणुकदारांना जवळपास 20.21 टक्के नफा झालेला आहे. CDSL कंपनीच्या शेअर्सने दि. 28 मार्च 2023 रोजी 880.90 चा लो बनविला होता.
CDSL कंपनी कोणते कार्य करते?
CDSL कंपनीचे तीन विभागामध्ये कार्य चालते ते खालील प्रमाणे
1) डिपॉझिटरी सेगमेंट :- गुंतवणूकदारांना विविध सेवा प्रदान करणे समाविष्ट आहे जसे की डीमटेरिअलायझेशन, रीमटेरियलायझेशन, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीजचे धारण, हस्तांतरण आणि सुरक्षा आणि कंपन्यांना ई-व्होटिंग सेवा प्रदान करणे.
2) डेटा एंट्री आणि स्टोरेज विभाग :- भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या नो युवर कस्टमर (KYC) दस्तऐवजांच्या केंद्रीकृत नोंदी ठेवण्याशी कार्य करते.
3)रिपॉझिटरी विभाग :- पॉलिसीधारक/वेअरहाऊस पावती धारकांना विमा पॉलिसी/वेअरहाऊस पावत्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून ठेवण्याची आणि पॉलिसी/पावत्यांमध्ये सुधारणा, सुधारणा करण्याची सुविधा पुरवतो. हे ई-लॉकर, मायसी मोबाइल अॅप, एम-व्होटिंग, ई-व्होटिंग, सिक्युरिटीज माहिती आणि सुरक्षित व्यवहारांसाठी स्मार्ट आणि इलेक्ट्रॉनिक प्रवेश देखील प्रदान करते.
सध्या या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. नेहाल व्होरा हे आहेत. या कंपनीची मार्केटकॅप हि जवळवास 13400Cr ची असून फेसव्हॅल्यु दहा रुपये आहे.
Investments in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing.
This post is really a pleasant one it assists new net people, who are wishing in favor of blogging.