मुंबई उच्च न्यायालय, या आस्थापनेवर चालक (Staff Car Driver) पदासाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या जे पात्र उमेदवार आहेत ते यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.
भरतीचा तपशील
-
भरती करणारा विभाग: मुंबई उच्च न्यायालय
-
पदाचे नाव: चालक (Staff Car Driver)
-
पदसंख्या: एकूण 11 रिक्त जागा (तात्पुरत्या स्वरूपाच्या)
-
नोकरीचे ठिकाण: मुंबई
-
पगार (वेतनश्रेणी): ₹29,200/- ते ₹92,300/- (Level-S10 प्रमाणे)
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
-
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाची 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
-
मराठी व हिंदी भाषेचे वाचन, लेखन व संवाद साधण्याचे कौशल्य असणे आवश्यक.
वयोमर्यादा:
-
दिनांक 9 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
-
न्यायालयीन कर्मचारी व शासकीय सेवकांसाठी वयोमर्यादेत सूट नाही.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी 284 जागांची भरती सुरु! (IGR_Peon_Job)
इतर आवश्यक पात्रता:
-
LMV ड्रायविंग लायसन्स (वाहन चालक परवाना) आवश्यक आहे.
-
किमान 3 वर्षांचा अनुभव LMV वाहन चालविण्याचा आवश्यक आहे.
-
वाहनांची देखभाल व सामान्य तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे.
-
मुंबई व परिसरातील रस्त्यांची, भूगोलाची माहिती असावी.
-
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असावे.
-
कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा.
अर्ज करण्याची पद्धत
-
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
-
अधिकृत संकेतस्थळावरून (https://bombayhighcourt.nic.in) लॉगिन करून अर्ज भरावा लागेल.
-
अर्ज सादर करताना खालील गोष्टी आवश्यक आहेत:
-
पासपोर्ट साइज फोटो (jpg/jpeg फॉर्मॅटमध्ये)
-
स्वाक्षरीचा स्कॅन
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ड्रायविंग लायसन्स, वयाचा दाखला इ.)
-
अर्ज शुल्क:
-
₹500/- (फक्त SBI Collect द्वारे ऑनलाइन भरावे लागेल.)
-
अर्ज शुल्क परत करण्यात येणार नाही.
अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख:
-
अर्ज सुरु होण्याची तारीख: २५ एप्रिल २०२५
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ९ मे २०२५
-
अर्ज सबमिट केल्यावर अर्जाचा प्रिंटआउट घ्यावा.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील प्रमाणे केली जाईल:
तपशील | गुण |
---|---|
लेखी परीक्षा (Objective Type) | 20 गुण |
अनुभव मूल्यांकन | 10 गुण |
वाहन चालविण्याची चाचणी | 10 गुण |
तोंडी परीक्षा (Interview) | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
परीक्षेचा विषय:
-
वाहनांची देखभाल व तांत्रिक ज्ञान
-
मुंबई शहराचा भूगोल व मुख्य मार्गांची माहिती
-
सामान्य ज्ञान
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
-
१०वी (SSC) किंवा समकक्ष परीक्षेचे प्रमाणपत्र
-
वैध LMV ड्रायविंग लायसन्स
-
३ वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र (ड्रायविंग संदर्भातील)
-
वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
-
जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
-
आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
-
निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
-
वाहन देखभाल व तांत्रिक ज्ञानाचा अनुभव दाखवणारे प्रमाणपत्र (जर असेल तर)
महत्वाच्या सूचना
-
अर्जातील सर्व माहिती बरोबर व अचूक भरावी.
-
अपूर्ण अथवा चुकीचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
-
अर्जाची फी एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही.
-
सर्व भरती प्रक्रियेचे अंतिम अधिकार मुंबई उच्च न्यायालयाकडे राखीव आहेत.
-
अर्ज सबमिट केल्यानंतर ‘Registration ID’ आणि ‘Date of Birth’ वापरून ‘Print Application’ पर्यायातून अर्जाचा प्रिंट घ्यावा.
अर्ज सादर करण्यापुर्वी मुळ जाहीरात पहावी.
मुळ जाहीरात पहा