After Retirement benefits : सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास योग्य मोबदला मिळवा असे वाटते कारण आयुष्याची बरीच वर्षे नोकरी केलेली असते. आयुष्याची 58/60 वर्षे शासकीय सेवेत खर्ची घातल्यानंतर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला कोणते लाभ मिळतात ते आज आपण पाहाणार आहोत.
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ खालीलप्रमाणे (After Retirement benefits)
1) सेवानिवृत्ती नंतर पेन्शन (Pension)किती मिळते ?
सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला पेन्शन दिली जाते. ती पेन्शन सेवानिवृत्तीच्या शेवटच्या मुळ वेतनाच्या निम्मे व नियमाप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. उदा. एका कर्मचाऱ्याचे शेवटचे मुळ वेतन 70000 होते. तर याचे निम्मे होतात 35000 रु. व या निम्म्या वेतनावर नियमाप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. सध्या याचा दर 42 टक्के आहे. आता 35000रु.चे 42 टक्के होतात. 14700 रु. म्हणजे आता एकूण पेन्शन 35000+14700= 49700/-
महागाई भत्ता हा दर सहामहिन्याला सुधारित केला जातो. त्यामुळे पेन्शन वेळोवेळी बदल होत असतो.
2) सेवानिवृत्ती नंतर रजा रोखीकरणाची रक्कम ( Leave encashment ) किती मिळते ?
सेवानिवृत्त झाल्यानंतर (After Retirement ) कर्मचाऱ्याच्या खाती अर्जित रजा जेवढया शिल्लक असतील तेवढया दिवसाचे वेतन मिळत असते. यासाठी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्याचे जे काही मुळ वेतन असेल त्या आधारे रजा रोखीकरणाचे देयक केले जाते. कर्मचाऱ्यास जास्तीत जास्त 300 दिवस अर्जित रजा शिल्लक ठेवता येतात व 300 दिवसापर्यंतच अर्जित रजेचे रोखीकरण मिळत असते. हि रक्कम अशी काढावी यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. समजा एका कर्मचारी 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाला व त्या कर्मचाऱ्याचे शेवटच्या दिवसाचे मुळ वेतन सातव्या वेतन आयोगानुसार 70000 रु इतके होते. या मुळ वेतनाला 30 दिवसांनी भागाकार द्यायचा व आलेल्या रक्कमेला 300 दिवसांनी गुणाकार करावचा. आलेली रक्कम एका कागदावर लिहून ठेवा. लक्षात घ्या येथे अर्जित रजा हया 300 दिवसांच्या आतच ठेवल्या जातात. म्हणजे काही कर्मचाऱ्याच्या अर्जित रजा हया 300 दिवसांपेक्षा कमीही असू शकतात.
तसेच सेवानिवृत्तीच्या दिवशी महागाई भत्त्याचा जो दर असेल त्या प्रमाणे जास्तीत जास्त 300 दिवसांचा महागाई भत्ता दिला जातो. महागाई भत्त्याची रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्तीच्या दिवशीचे मुळ वेतन घेउन त्याला त्या दिवशी जो महागाई भत्त्याचा दर असेल त्या दराने रक्कम काढावी व व आलेल्या रक्कमेला 30 दिवसांनी भागाकार करावा म्हणजे एक दिवसाचा महागाई भत्ता येईल. आता तुमच शिल्लक असणा-या रजेने गुणाकार करावा म्हणजे तुमची एकूण शिल्लक असणा-या रजेचा महागाई भत्ता येईल.आता वरील सांगितल्याप्रमाणे मुळ वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम यांची दोघांची बेरिज करुन जी रक्कम येईल ती म्हणजे तुमची रजा रोखीकरणाची रक्कम असेल.
उदा. 1. 60000/30=2000*300= Rs.600000/-
2. 60000*42/100=25200/30=840*300= Rs.252000
Rs.600000+252000=852000
3) सेवानिवृत्ती नंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम (General Provident Fund) किती मिळते ?
शासकीय सेवेत नियुक्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधीचे खाते ओपन केले जाते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पगारातून त्यामध्ये वर्ग केली जाते. हि रक्कम किती असावी हे ठरविण्याचे स्वातंत्र कर्मचाऱ्यास असते. परंतु भविष्य निर्वाह निधीच्या नियमाप्रमाणे जी कमीत कमी रक्कम असेल त्याच्यापेक्षा कमी रक्कम करता येत नाही. येथे जमा होणाऱ्या रक्कमेवर शासनाच्या नियमाप्रमाणे व्याजदर मिळत असते.
यातील रक्कम काही नियम व अटीच्या अधीन राहून रक्कम सेवानिवृत्तीपुर्वीही काढता येते. यामध्ये घरबांधण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी तसेच मुला मुलींच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी यातून रक्कम काढता येते. प्रत्येक महिन्याला कपात होणारी रक्कम हि सेवानिवृत्तीच्या तीन महिने अगोदर बंद केली जाते. हि कपात बंद झाल्यानंतर कर्मचारी लगेच यातील सर्व रक्कम आजपर्यंतच्या व्याजासह काढण्यासाठी पात्र असतो. त्यासाठी ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर असेल त्या आस्थापनेमार्फत रक्कम काढण्याचा अर्ज महालेखापाल, एजी ऑफीस यांच्याकडे पाठवायचा असतो. जेणेकरुन सेवानिवृत्ती नंतर लगेच हि रक्कम प्राप्त होईल.
4) सेवानिवृत्ती नंतर गट विमा योजना (GIS) ची रक्कम किती मिळते ?
गट विमा योजनेची रक्कम हि प्रत्येक महिन्याला पगारातून कापली जात असते. तसेच हि रक्कम वेळोवेळी सुधारित केली जाते. सेवानिवृत्ती नंतर हि रक्कम मिळते. त्यासाठी निवृत्त झाल्यानंतर हि रक्कम मिळणेचा अर्ज सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयाकडे पाठवावा, त्यानंतर कार्यालय त्याचा आदेश तयार करुन सेवानिवृत्तीच्या कार्यालयाला पाठविला जातो. त्यानंतर तेथील बिल क्लार्क याचे देयक तयार करुन कोषागार कार्यालयाकडून मंजुर करुन खात्यावर जमा करेल.
5) सेवानिवृत्ती नंतर उपदान (Gratuity) ची रक्कम किती मिळते ?
महाराष्ट्र शासन निर्णय क्र. सेनिवे- 2019/प्र.क्र.58/सेवा-4, दि.01 मार्च 2019 मधील परिच्छेद क्र.6 नुसार सातव्या वेतन आयोगान्वये सुधारीत मूळ वेतनावर निवृत्ती उपदानाची परिगणना करण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 111 (1) अन्वये दिनांक 01/01/2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्हताकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण सहामाही कालावधीकरीता त्यांच्या सुधारीत वेतनाच्या एक चतुर्थाश इतके तथापि सुधारीत वेतनाच्या कमाल 16 1/2 पट किंवा 14 लक्ष यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहिल.
उदाहरणार्थ एका कर्मचा-याचे मुळ वेतन 72100 असेल तर
रु 72100/- च्या 1/4 =18025*66 महिने = 1189650
सुधारीत वेतनाच्या कमाल 16.5 पट =72100*16.5 = 1189650
येणारी रक्कम ही जर चौदा लाखाच्या पुढे जात असेल तर कमाल 14 लाख रुपयांपर्यंत सिमीत करण्यात आली आहे.
These are some bill of after Retirement Benefits.
टिप- यामधील काही लाभ हे एनपीएस धारक कर्मचा-याना अपवाद आहेत.
सदर लेख जास्तीत जास्त शेअर करा
Join Our Group👇
https://chat.whatsapp.com/BtgZMleJLpj4nOrAbbVmps