तुमच्या जमीनीचा सातबारा करा मोबाईवर डाउनलोड!

 तुमच्या जमीनीचा सातबारा पहा मोबाईवर

    आता तुमच्या जमीनीचा सातबारा काढण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही तलाठी कार्यालयात न जाता चक्क तुमच्या मोबाईलवर सातबारा काढु शकता. तसेच ई-फेरफार, प्रॉपर्टीकार्ड, 8अ सुध्दा काढु शकता. चला तर मग आज आपण सातबारा मोबाईवर कसा काढायचा ते बघुया. सर्वप्रथम तुम्हाला गुगल ब्राउजरमध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in हा संकेतस्थळाचा पत्ता टाईप करा. त्यानंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे पेज दिसेल. 

ओपन झालेल्या पेजमध्ये डाव्या बाजुला  OTP Based Login या बटणला क्लिक करुन खालच्या बॉक्स मध्ये मोबाईल क्रमांक Enter Mobile Number प्रविष्ठ करुन Send OTP या बटणला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईवर एक ओटीपी येईल तो खालच्या बॉक्समध्ये दिलेल्या रकान्यामध्ये प्रविष्ठ करुन व्हेरीफाय करा.  

2. व्हेरीफाय केल्यानंतर खालीलप्रमाणे तुम्हाला होम पेज दिसेल 

आता तुम्हाला हवे असलेले कागदपत्र म्हणजे सातबारा, 8अ, ई-फेरफार, प्रॉपर्टी कार्ड यापैकी एकाला क्लिक करा व विचारलेले माहिती भरा. जसे की जिल्हा , तालुका, गाव, सर्वे नं भरुन 15 रुपयाचे शुल्क ऑनलाईन भरा.त्यानंतर तुमचा सातबारा डाउनलोड होईल. तुम्हाला मिळालेला सातबारा हा डिजिटल सही केलेला मिळेल.

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच