जयावंतराव सावंत महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, पुणे | दि.६/११/२०२३. जयावंतराव सावंत महाविद्यालयांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आजाद अवाज विद्यापीठ, इराणच्या महिला प्राध्यापिका डॉ.इलहाम जाफर जधेह यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप गवते, सूक्ष्मजीव विभागाच्या प्रमुख अर्चना घाडगे, आयोजक राजेश ढाकणे, सुनील हडके यांनी परीक्षम घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्यास भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख राहुल विश्वासे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयावंतराव सावंत शिक्षण संस्थेच्या हडपसर विभागाचे डायरेक्टर डॉ. संजय सावंत व डॉ.वसंत बुगडे व टी.एस.एस.एम ग्रुप चे सचिव श्री. जी.टी सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच