जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हडपसर, पुणे व एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल सायन्स यांच्या संयुक्त विद्यामाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

हडपसर, पुणे | जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हडपसर, पुणे, एशियन कॉलेज सायन्स अँड कॉमर्स, धायरी व इंटरनॅशनल जनरल ऑफ मायक्रोबियल सायन्सच्या संयुक्त विद्यामाने ‘संशोधन पद्धती’ या विषयावर ४ व ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय कार्यक्रम शाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेश ढाकणे व एस.एम.जोशी महाविद्यालय, हडपसरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अमृता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ३१ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयावंतराव सावंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप गवते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख अर्चना घाडगे तसेच कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सावंत, डॉ.वसंत बुगडे व टी.एस.एस.एम ग्रुपचे सचिव श्री. जी.टी. सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स च्या संस्थापिका अध्यक्षा अनिता सापते, प्राचार्या डॉ. सविता सिंग, उपप्राचार्या श्रुती रेगे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख तृप्ती धकाते, आकांक्षा डांबरे, प्राजक्ता मोहिते, रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आभा चव्हाण, दुर्गा जाधव, अंकिता वर्मा, प्रियंका उत्तरडे यांनी मोलाचे योगदान दिले. सदर कार्यक्रमासाठी जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या बी.एस.सी (सूक्ष्मजीवशास्त्र) तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी मोनिका नारायणकर व ऋतुजा पांचाळ यांनी सहभाग नोंदवला.

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच