सध्या उन्हाचा कडाका वाढतच आहे. या कालावधीत किती पाणी पिणे आवश्यक आहे, याची माहिती आज आपण घेणार आहोत. उन्हाळयाच्या कालावधीत अधिक तहान लागते. मात्र अनेक लोकं त्यांच्या कामामुळे किंवा व्यस्त वेळापत्रकामुळे पाणी पिणं विसरुन जातात. हि बाब आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे या कालावधीत वेळेत पाणी पिणे गरजेचे आहे. एका व्यक्तीला निरोगी राहण्यासाठठी एका दिवसात दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तसेच जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा त्वरित पाणी प्यायलं पाहिजे.
पाणी पिण्याचे फायदे
👉 पाण्यामुळे त्वचा चांगली राहते.
👉 वजन कमी करण्यास मदत होते.
👉 शरीराचं तापमान नियंत्रित राहते.
👉 शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
👉 पुरेसं पाणी पिण्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.